कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आज, २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला असून या मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच नॅशनल हायवे प्रकल्प, सात रेल्वे प्रक्लपांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक दर्या आहेत ज्यात चढ- उतार आहेत, अनेक वळणदार घाट आहेत. या रेल्वे मार्गातील विद्युतीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, आता त्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याने या रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक वेगाने करता येणार आहे.
कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा
धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या
धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!
रेल्वे मंत्रालयाने २०१६ साली कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ७४१ किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आता, विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे.