कर्नाटकमध्ये आत्ता भाजपची सत्ता आहे. पण कर्नाटकमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दहा मे ला विधानसभा निवडणूक होणार असून १३ मे ला मतमोजणी होऊन त्याचा निकाल लागणार आहे. आज निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि, कर्नाटकात एकूण पाच पूर्णांक २१ कोटी एवढे मतदार असून विधानसभेच्या जागेवर नऊ पूर्णांक १७ लाख मतदार हे ह्या वेळेस पहिल्यांदाच मतदान करणार आहे. एक एप्रिलला ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे त्यांनासुद्धा मतदान करता येणार आहे. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत हि भाजपा, काँग्रेस आणि जे डी एस यांच्यामध्ये होणार आहे. भाजप सरकारचा कार्यकाळ हा २४ मे ला संपणार आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागा असून २०१८ ला विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला १०४, काँग्रेसला ७८, तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळीस बहुमत असे कोणालाच मिळाले नव्हते. १७ मायला येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली होती पण, बहुमत सभागृहात सिद्ध न झाल्याने त्यांनी २३ मे ला राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस चे आघाडीचे सरकार आले होते. कर्नाटकच्या राजकारणाला त्यानंतर १४ महिन्यांनंतर कलाटणी मिळाली आणि आमदारांच्या बंडानंतर कुमारस्वामी याना सत्तेवरून जावे लागले.
हे ही वाचा:
गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी
भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन
करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या
भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’
येडीयुरप्पा यांनी बंडखोर आमदारांना भाजपमध्ये विलीन करून २६ जुलै २०१९ साली २१९ आमदारांच्या पाठिंब्याने बी.एस. येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. परत त्यांनी दोन वर्षांनी राजीनामा दिला. विधानसभा एकूण २२४ जागा असलेले कर्नाटक हे राज्य सहा वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले आहे. यामध्ये हैदराबाद कर्नाटक, मुंबई कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, मुंबई कर्नाटक , मध्य , किनारपट्टी, बंगळूर अशा सर्व ठिकाणी मिळून एकूण १०१ जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने १५० जागांचे लक्ष ठेवण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण तीन महिन्यामध्ये सात वेळा कर्नाटकाचा दौरा केला आहे. आता येडी युरप्पा हे ७९ वर्षीय यांनी चार राज्यांचे मुख्यमंत्री राहिलेले आता प्रचार समितीचे प्रमुख बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.