येत्या १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यांनतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी उपराष्ट्रपती निवडणूक असणार आहे, त्याच दिवशी या निडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
Election to the Office of the Vice President to be held on 6th August 2022.
— ANI (@ANI) June 29, 2022
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा १० ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपत आहे. निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. यांनतर २० जुलै रोजी उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २२ जुलै आहे. त्यांनतर गरज पडल्यास ६ ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असून, त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
हे ही वाचा:
डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यांची मतमोजणी २१ जुलैला होणार आहे आणि २५ जुलैला नवीन राष्ट्रपती शपथ ग्रहण करणार आहेत. यासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने घोषणा केली आहे. तर विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी तृणमुल काँग्रेसचे यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.