राज्यसभेच्या ५७ जागांसाठी होणार १० जूनला निवडणूक

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी होणार १० जूनला निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यसभेतील अनेक नेत्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे १० जूनला निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

निवडणुकीची सूचना २४ मे रोजी जारी होणार आहे. ३१ मे पर्यंत उमेदवारांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. तर ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून १० जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे भाजपाचे राज्यसभा खासदार पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांच्या ६जागांसह राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

ग्यानव्यापीचा सर्वे होणारच! वाराणसी न्यायालयाचा फैसला

…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!

उत्तर प्रदेशात मदरशामध्ये गावे लागणार राष्ट्रगीत

२१ जून ते १ ऑगस्टदरम्यान या ५७ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत होणार आहे. त्यानंतर त्यांच्या जागा रिक्त होतील. यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक अकरा जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा जागांसाठी, बिहारमधून पाच, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधून प्रत्येकी चार , मध्य प्रदेश आणि ओडिशा, पंजाबमधून प्रत्येकी तीन जागांसाठी मतदान होणार आहे. झारखंड, हरियाणा. छत्तीसगड आणि तेलंगणामधील प्रत्येकी दोन जागा आणि उत्तराखंडमधील एका जागेसाठी मतदान होणार आहे.

Exit mobile version