हसन मुश्रिफ यांचा अजब दावा
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या दीड वर्षात केलेल्या कामाची आता त्यांनाच भीती वाटू लागली असावी. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर संपूर्ण राज्यात ७० टक्के लसीकरण व्हायला हवे असे दावे ते करू लागले आहेत.
जोपर्यंत महाराष्ट्रात ७० टक्के लोकांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत, असा दावा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी केला आहे.
हे ही वाचा:
पत्र ‘प्रताप’ केवळ स्वार्थापोटी
मुलुंडमधील धक्कादायक प्रकार; मुलाची हत्या करून पित्याची आत्महत्या
मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली
धक्कादायक! कुटुंबातील पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात रविवारपर्यंत २ कोटी ७६ लाख ९९, ४१९ लोकांचे लसीकरण झालेले आहे. जर ७० टक्के लसीकरण व्हायचे असेल तर आणखी ६ कोटी जनतेचे लसीकरण व्हावे लागेल. त्याला किती महिने लागतील हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र तोपर्यंत या निवडणुका होऊ नयेत असे महाविकास आघाडीचे धोरण आहे.
सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजात महाविकास आघाडीबद्दल रोष आहे. त्या रोषाचे प्रतिबिंब या निवडणुकांत पडू नये, आपल्याला त्याचा फटका बसू नये म्हणून आता ७० टक्के लसीकरण होईपर्यंत निवडणुका नकोत, असा पवित्रा ठाकरे सरकारने घेतला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याआधी असेच विधान केले होते. त्यावरून कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी मुश्रिफ यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ७० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत स्थानिक निवडणुका होणार नाहीत. तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्नही तोपर्यंत सुटेल.