काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल आज लागत आहेत. सकाळपासूनच या राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येताना दिसत आहेत. या पाचही राज्यांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे पानिपत होताना दिसत आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी उत्तर प्रादेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांमध्ये भाजपा आपली सत्ता राखताना दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता उखडून आम आदमी पक्ष सत्तेत येताना दिसत आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या चारही राज्यांमध्ये काँग्रेसला जनतेने नकारलेले दिसत आहे. त्यातल्यात्यात गोव्यामध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण सुरुवातीचे कल बघता गोव्यातही काँग्रेस अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेस आपली सत्ता गमावताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने गमावलेल्या राज्यांमध्ये पंजाबची भर पडणार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर

भाजपा सपा मध्ये लागली ही अनोखी पैज

पाच राज्यात मतमोजणी सुरु! चार राज्यात भाजपा, पंजाबमध्ये आप

प्रियांका गांधी पण फेल
भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष प्रियांका गांधींच्या नेतृत्वात निवडणूक लढत होता. ‘लडकी हू, लढ सकती हू’ असे म्हणत त्यांनी महिला मतदारांना साद घालायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे ट्रम्प कार्ड म्हणून पुढे केले जात होते. पण हे ट्रम्प कार्ड देखील वाया गेल्याचे चित्र आहे. या आधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला जनतेने नाकारले होते तर आता प्रियांका गांधींनाही जनतेचा कौल मिळत नाहीये.

Exit mobile version