साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे आज निकाल लागत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये नेमके कोणाचे सरकार तयार होणार हे आज ठरणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालांचा कल नेमका कोणत्या पक्षासाठी आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे.
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशची सत्ता राखताना दिसत आहे. तर त्या सोबतच उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यनमध्येही भाजपा जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. तर पंजाबमध्ये जनता आम आदमी पक्षाच्या मागे उभी असलेली दिसत आहे. काँग्रेसची पंजाबची सत्ता उखडून तिथे आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करताना दिसत आहे.
या निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये मिळून अनेक दिग्गजांचे भवितव्य नेमके काय असणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी, मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांच्या जागांकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. तर पंजाबमध्ये अमरिंदर सिंग, भगवंत मान, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव, केशव प्रसाद मौर्य यांच्या जागांच्या निकालांचीही उत्सुकता आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!
राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर
भाजपा सपा मध्ये लागली ही अनोखी पैज
….म्हणून फ्लिपकार्टने महिलांसमोर घातले लोटांगण
तर गोव्यामध्ये भाजपाचे बंडखोर आणि मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव असलेले उत्पल पर्रीकर यांचे काय होणार याचीही लोकांमध्येही उत्सुकता आहे. सोबतच उत्तराखंडमध्ये काँग्रेस नेते हरीश रावत यांच्या निवडणुकीकडेही लोकांचे लक्ष आहे.
पण या पाचही राज्यांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सपशेल आपटताना दिसत आहे. भाजपाकडे असलेल्या कोणत्याही राज्यात काँग्रेस अपेक्षे प्रमाणे सादरीकरण करताना दिसत नाहीये. तर पंजाबमध्ये असलेली सत्ताही काँग्रेसला राखता आलेली नाही.