नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी एक म्हण आहे. तशीच गत सध्या काँग्रेसची आहे. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही काँग्रेसला अध्यक्ष लाभलेला नाही. त्यात आता करोनाचे कारण पुढे करत २३ जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे कळते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगलच्या निवडणुकीत दणकून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली. सध्या सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत. पण पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्यास आता कोरोनामुळे आणखी विलंब होणार आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार जाणुनबुजून लस उपलब्ध करुन देत नाहीये
पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस
सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर
आता कोविडकाळात निवडणुका घेणे योग्य नाही असा बचाव करत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे.
काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे पक्षाची हानी होत असल्याचे मत काही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र काँग्रेसच्या एकूण वर्तुळावर गांधी परिवाराची पकड मजबूत असल्याचे त्यातूनच एखादी व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवडली गेली आहे. आता तर कोरोनाचे आयते कारण पुढे करून निवडणुका रद्द करत असल्याचा शहाजोगपणा दाखवला आहे. यापुढची निवडणुकीची तारीख काँग्रेसची केंद्रीय निवडणुक समिती जाहिर करेल, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांनी २०१७मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती, पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.