25 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरराजकारणधनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर

धनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेसंदर्भातील कागदपत्रे अद्याप निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठीही मुदतवाढ मागितली गेल्याचे कळते.

Google News Follow

Related

धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय आज, ७ ऑक्टोबरला निवडणूक आयोग घेणार असल्याची शक्यता वर्तवली जातं होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज होईल, अशी शक्यता वर्तवली जातं होती. मात्र तूर्तास हा निर्णय लांबणीवर पडला आहे अशी माहिती आहे.

धनुष्यबाण चिन्हाचा फैसला करण्याआधी बंडखोर आमदारांच्या अपात्रचे निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी या मागणीचा विरोध केला होता. निवडणूक आयोगाला आपलं काम करण्यासाठी परवानगी द्यावी, असे एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली होती. मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला धनुष्यबाण चिन्हाबाबत कारावई करण्याचे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेसंदर्भातील कागदपत्रे अद्याप निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठीही मुदतवाढ मागितली गेल्याचे कळते.

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

दरम्यान, अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त होती. त्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना आमने सामने आहेत. शिवसेनकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपाकडून मुरजी पटेल यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी जर हा निर्णय झाला नाही, तर निवडणूक आयोगाला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू लागू शकते. त्यानंतर दोन्ही गटांना एक तात्पुरतं चिन्ह दिलं जाऊ शकतं, असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला निवडणूक आयोगाला पुराव्यांची पडताळणी करुन घ्यावा लागेल, असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा