29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण'भ्रष्टाचार रेट कार्ड' प्रसिद्ध केल्याबद्दल निवडणूक आयोगाची काँग्रेसला नोटीस

‘भ्रष्टाचार रेट कार्ड’ प्रसिद्ध केल्याबद्दल निवडणूक आयोगाची काँग्रेसला नोटीस

उत्तर देण्यासाठी पक्षाने मागितला आणखी वेळ

Google News Follow

Related

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावते असतांनाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या विरोधात वर्तमानपत्रांमध्ये शनिवार, ६ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘करप्शन रेट कार्ड’ जाहिरातींबाबत निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या कर्नाटक विभागाला नोटीस बजावली आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी रविवार संध्याकाळपर्यंत पुरावे सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे.

कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने एका वृत्तपत्रात भ्रष्टाचार दर कार्डाची जाहिरात दिली होती, ज्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. यासोबतच पक्षाला २४ तासांत हे आरोप सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. कर्नाटकातीळ विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने २०१९ ते२०२३ या काळातील राज्यातील भ्रष्टाचाराचे दर सूचीबद्ध करणारे पोस्टर्स आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्याचबरोबर भाजप सरकारवर ‘ट्रबल इंजिन’ म्हणून आरोप केला होता.

आयोगाने कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षांना अनुभवजन्य पुरावे, नियुक्त्या आणि बदल्यांसाठीचे दर, नोकऱ्यांचे प्रकार आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कमिशनचे प्रकार आणि स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. असल्यास ते सोबत द्यावे. ते सार्वजनिक मंचावरही मांडावे, असे निवडणूक आयोगाने आपल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने आपल्या नोटीसमध्ये काँग्रेसकडे भौतिक/अनुभवजन्य/पडताळणी करण्यायोग्य पुरावे आहेत ज्याच्या आधारे ही विशिष्ट/स्पष्ट ‘तथ्ये’ प्रकाशित करण्यात आली आहेत, अशी कृती ज्ञान, इच्छा आणि हेतू यांच्या पलीकडे आहे. आणि असे करण्यामागील हेतू तपासण्यासाठी वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन केले जाऊ शकते असे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने आयोगाने यापूर्वी २ मे रोजी सर्व पक्ष आणि संबंधितांना निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता पाळण्याचा सल्ला दिला होता आणि राजकीय प्रवचनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी विधानांच्या भाषेबद्दल काळजी घ्यावी. आयोगाने राजकीय पक्षांना प्रचार आणि निवडणुकीचे वातावरण खराब न करण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढलेल्या आहेत.

हे ही वाचा:

इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार

अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!

संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ‘करप्शन रेट कार्ड’वरून कर्नाटकमधील काँग्रेसने भाजपवर ‘पक्षपाती’ असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी दिलेला वेळ खूपच कमी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला अनेक वेळा इशारा देऊनही आयोगाने त्यांच्याविरुद्ध कोणतीही नोटीस जारी केलेली नाही अशी उलटी बॉम्ब देखील आता काँग्रेसने मारली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा