मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले…प्रभाग सीमांकनाची अधिसूचना जाहीर

मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले…प्रभाग सीमांकनाची अधिसूचना जाहीर

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीचे पडघम वाजले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईती प्रभागांच्या नव्या सीमांकनाची अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ज्यावर आता मुंबईतीव जनतेच्या तक्रारी व सूचना घेतल्या जातील. या नव्या अधीसुचनेत मुंबईतील प्रभागांची संख्या २३६ करण्यात आली आहे. २०२२ मध्ये मुंबईतील लोकसंख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळेच मुंबईतील प्रभाग संख्या वाढवण्यात आली आहे. या आधी मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ होती त्यात आता ९ प्रभागांची भर पडणार असून प्रभाग संख्या २३६ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जातींसाठी १५ तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर महिलांसाठी ११८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ८ अनुसूचित जाती आणि १ जागा एसटी महिलांसाठी राखीव आहे. तर उर्वरित १०९ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असतील.

हे ही वाचा:

परीक्षा घोटाळा प्रकरणी कृषी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर

‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’

मेरे वतन के लोगों, १००० ड्रोन्स, लेझर शो…

मुंबईत मतदारांची एकूण संख्या १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी आहे. या पैकी एससी ८ लाख ३ हजार २३६ तर एसटीचे मतदार १ लाख २९ हजार ६५३ आहे. प्रभागांचे सीमांकन करण्यासाठी मतदारांची संख्या ५२,७२२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. यामध्येही किमान ४७,४५० आणि कमाल ५७,९६४ मतदार आहेत.

Exit mobile version