देशातील पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून या राज्यांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो, सभा यावर बंदी घातली होती. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शो, सायकल मार्चवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे.
पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुक आयोगाने प्रथम १५ जानेवारी, २२ जानेवारी त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत रॅली, सायकल मार्च, रोड शोवर बंदी घातली होती. ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे. घरोघरी प्रचारासाठी फक्त पाच जणांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता घरोघरी प्रचारासाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुक आयोग रॅली, सायकल मार्च आणि रोड शोबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
हे ही वाचा:
हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम
अरेरे !! थ्रेशर मशीनमध्ये युवकाचा पाय अडकला आणि…
परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’
पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना थोडा दिलासा दिला आहे. खुल्या जागेत १ हजार लोकांच्या उपस्थितीत सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बंदिस्त जागेत ५०० जणांना परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रचार करावा असेही सांगण्यात आले आहे.