पुढल्या काही महिन्यांमध्ये देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब अशा पाच राज्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. शनिवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. तर कोविड परिस्थितीचा अंदाज घेऊन निवडणुकीचा नियमावलीत करण्यात आलेल्या बदलांची ही माहिती दिली आहे.
एकूण ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार असून सर्व प्रकारच्या कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करूनच निवडणूक प्रचार, मतदान आणि मतमोजणी असा सर्व निवडणूक कार्यक्रम पूर्ण केला जाणार आहे. कोविड परिस्थितीचा विचार करता काही नवीन नियम या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
हे ही वाचा:
पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा
चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर
कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका
आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच
काय असणारे नवीन नियमावली?
सध्या देशभर पसरलेले कोविड महामारीचे सावट लक्षात घेतात निवडणूक प्रचारादरम्यान रोड शो, सायकल रॅली, बाईक रॅली यावर बंदी घालण्यात आली आहे. तर डोअर टू डोअर कॅम्पेन अर्थात घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रचार करताना एका वेळी जास्तीत जास्त पाच जणच प्रचारासाठी जाऊ शकतात असे बंधन निवडणूक आयोगाने घातले आहे. पुढच्या आठवड्याभरासाठी म्हणजे १५ जानेवारीपर्यंत हर प्रकारच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तर त्यांनतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. तर प्रचार फेरी संदर्भातील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर घेतला जाईल.
मतदानासाठीची वेळही एका तासाने वाढवण्यात आली आहे. तर रात्री आठ वाजताच सर्व प्रचार बंद होणार आहे. रात्री ८ ते सकाळी ८ सर्व प्रकारच्या प्रचारावर बंदी असेल. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासोबतच ८० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांनाही पोस्टल बॅलेटची सुविधा पुरवली जाणार आहे.