27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणशिवसेनेच्या चिन्हाचा धनुष्य बाण कुणाच्या भात्यात ?

शिवसेनेच्या चिन्हाचा धनुष्य बाण कुणाच्या भात्यात ?

योजना बी तयार !

Google News Follow

Related

शिंदे गटाला शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळाल्यास ठाकरे गट काय करणार? योजना बी तयार !
शिवसेनेच निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाच्या खात्यात जाणार की ठाकरे गटाच्या खात्यात याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग येत्या १७ जानेवारीला देणार आहे. शिंदे गटाच्या बाजूने निर्णय आल्यास ठाकरे गटाचा प्लॅन बी काय असणार याची उत्सुकता आहे.

शिवसेनेतील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी ५५ पैकी ४० आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. यासोबतच दहा अपक्ष आमदारही होते. गुवाहाटीहून परतल्यावर मुंबईत शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाले.त्यानंतर त्यांना शिवसेनेचे बहुमत खासदारांचे बहुमतही मिळाले. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले आहेत.यानंतर शिंदे गटाने आपला गटच खरी शिवसेना असल्याच सांगून निवडणूक चिन्हावर त्यांच्या गटाचा दावा केला असून सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.

अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले आहे. शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह ‘तलवार आणि ढाल’ तर ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह ‘पेटती मशाल’असे आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

 

१७ जानेवारीला निवडणूक आयोग कोणाच्या नावावर धनुष्यबाण करणार?
यावेळी खरी शिवसेना कोणाची? या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. पण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर अधिकार कोणाचा? त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. निवडणूक आयोगात येत्या सतरा जानेवारीला सुनावणी होणार आहे.

शिंदे गटाला निवडणूक चिन्ह दिल्यास ठाकरे गट काय करणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाने दोन योजना तयार केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील अशी पहिली योजना असून दुसरी योजना आपल्या गटाच्या निवडणूक चिन्हासाठी आणि नावासाठी जनतेकडून मतं जाणून घेतील आणि जनतेच्या मताने आपल्या पक्षाचे नवीन चिन्ह आणि नाव ठरवणार असल्याचे कळते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा