देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राजकारणातील या भूकंपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रादेशिक पक्ष म्हणून गणला जाणार आहे.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. यानंतर राजकीय समीकरणे बदलणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
२०१६ मध्ये, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी नियम बदलले. आता हा आढावा पाच ऐवजी १० वर्षात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी देशातील किमान चार राज्यांमध्ये त्यांच्या उमेदवारांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले
देशाच्या राजकारणात अवकाळी, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ! हवालदिल बळीराजाला मुख्यमंत्र्यांचा दिलासा
एअर इंडियातील क्रू मेंबरला मारहाण करणारा प्रवासी जेरबंद
लोकसभेत किमान चार खासदारांनी त्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत असे म्हटले जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची संख्या घटली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसला २०१९ च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यासह, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
आता किती राष्ट्रीय पक्ष आहेत?
भारतीय जनता पक्ष ,काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पार्टी (आप). आप हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे.