लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
“चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे विक्रमी मतांनी विजयी होतील. एनडीए, शिवसेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विग्वीजयाची गुढी देखील उभारतील. तसेच, पंतप्रधान म्हणून हॅट्रीक देखील मारतील,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. देशात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली नाही. तेवढी कामे दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी केली आहेत,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावरही निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला परंतु त्यांनी खरेतर जाहीरनाम्याऐवजी माफीनामा प्रसिद्ध करायला पाहिजे होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. देशातील १४० कोटी जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गॅरेंटी घेतली आहे. देशात आणि मार्केटमध्ये मोदी गॅरेंटी चालते. इतरांच्या गॅरेंटीवर कोणी भरोसा करत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हे ही वाचा..
चंद्रबाबू नायडू म्हणतात सत्तेत येताच आंध्रप्रदेशमध्ये मद्याच्या किंमती कमी करणार
”मी डॉक्टर नसलो तरी काहींचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवलेत”
हैदराबादच्या लेडी सिंघम माधवी लता म्हणतात, असदुद्दीनला हरवणारच!
रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!
“पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात जनसागर आला आहे. या जनसागरात आपल्याला उद्याचा जल्लोष दिसतो आहे. असाच जल्लोष आपल्याला ४ जून रोजी निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर करायचा आहे. या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे विक्रमी मतांनी विजयी होतील आणि एनडीए, शिवसेना, पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विग्वीजयाची गुढी देखील उभारतील. तसेच, पंतप्रधान म्हणून हॅट्रीक देखील मारतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.