30 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
घरराजकारणसरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी लिहिली पोस्ट

सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी लिहिली पोस्ट

दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात आले होते महायुतीचे सरकार

Google News Follow

Related

दोन वर्षांपूर्वी म्हणजे ३० जून २०२२ला महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता आणि एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. त्या द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट लिहित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि सामान्यांच्या विश्वासाच्या बळावर महायुती सरकारने यशस्वी वाटचाल केल्याचे त्यात म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विचार, विकास आणि विश्वास ! सस्नेह जय महाराष्ट्र राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले.

हे ही वाचा:

टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता

इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

खोट्या बातम्यांमुळे मिड-डे, राजदीप सरदेसाई, ध्रुव राठीविरुद्ध तक्रार

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा