शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना- भाजपा सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे- फडणवीस सरकारने बाजी मारली आहे. १६४ मतांनी बहुमत सिद्ध करत सभागृहात एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे.

आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव मांडला. आवाजी मतदानानं चाचणी पार पडल्यानंतर पोलची मागणी करण्यात आली. त्यानंतर सभागृहात हेडकाऊंटने मतदान पार पडले. यावेळी शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने १६४ मतं पडली. या मतांसह शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकची सिनी शेट्टी बनली ‘मिस इंडिया २०२२’

डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू

भाजप-शिवसेनेची आज बहुमत चाचणी

उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता

काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिवसेना-भाजपा युती सरकारकडून उद्धव ठाकरेंना धक्का मिळाल्यानंतर शिंदे सरकारने आजची बहुमत चाचणी यशस्वी पार केली. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने १६४ मतं पडली. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने १६४ मतं पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात ९९ मतं पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात १०७ मतं पडली होती. मात्र, आज बहुमत चाचणीच्या वेळी महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही.

Exit mobile version