एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून दूर केले!

एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून दूर केले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र

महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याचे पत्र दिले आहे.

या पत्रात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आपल्याला पक्षनेतेपदावरून हटविण्यात येत आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मातोश्रीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनचे खासदारही उपस्थित होते. त्यावेळी शिंदे यांना नेतेपदावरून हटविल्याचे पत्र समोर आले.

आठ वाजल्यापासून ही बैठक मातोश्रीवर सुरू होती. त्या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे मात्र उपस्थित नव्हते तसेच खासदार भावना गवळी यादेखील या बैठकीला उपस्थित नव्हत्या. गवळी या बैठकीला का उपस्थित नव्हत्या याची चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

फडणवीसांनी केला तो खरा ‘त्याग’

 

एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत ५०पेक्षा अधिक आमदार घेऊन सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिवसेनेत उभी फूट पडली. शेवटी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचा कारभार आटोपला. त्यानंतर एकनाथ शिंदे एकटेच मुंबईत आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे केला. नंतर प्रत्यक्षात आणखी एक ट्विस्ट मिळाला आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेलेशिवसेनेचे आमदार, मंत्री हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिंदे यांना नेतेपदावरून दूर केले आहे.

Exit mobile version