शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने एकनाथ शिंदेंची निवड!

बैठकीत ठरावाला मंजुरी

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने एकनाथ शिंदेंची निवड!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निकालानंतर राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला जनतेचा कौल मिळाला. यानंतर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले. यात सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

यानंतर गुलाबराव पाटील यांनीही निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल मतदारांचे आभार मानणारा ठराव मांडला. एकमताने हा ठराव मान्य करण्यात आला. पुढे दादा भुसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. हा ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पुढे एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव उदय सामंत यांनी मांडला, त्याला प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला. सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.

हे ही वाचा : 

निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

आता नवी आवई म्हणे अनुसूचित जमाती हिंदू नाहीत ? !

पंत ठरला श्रीमंत, आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू!

महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी हाती दिलेला भगवा फडकत ठेवणारे एकनाथ शिंदे. सत्तेच्या लोभापायी ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण टाकला होता, तो सोडवून आणणारे, जनतेला थेट लाभ देणाऱ्या अनेक योजना आणून महाराष्ट्राच्या घराघरात हसू फुलवत ठेवणारे, गोरगरिब, महिला, शेतकरी, दलित, वंचित, तरुण, ज्येष्ठ आणि सर्व समाजाच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे यांच्या अभिंदनाचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला.

Exit mobile version