शिवसेना कोणाची ? ठाकरेंची की शिंदे गटाची, धनुष्यबाण कोणाचा हा चेंडू सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये एक पोस्टर शेअर केली आहे. निवडणूक निकालांच्या पोस्टरमध्ये थेट उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून वेगळे केले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे ट्विट सध्या व्हायरल झाले आहे.
शिवसेना आमचीच या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम असून ते सिद्ध करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त केली आणि नवीन कार्यकारीणी जाहीर केली. त्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेले बरेचसे निर्णय बदलले. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असा उल्लेख न करता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा केला.
शिवसेना आमचीच असल्याचे एकनाथ शिंदे प्रत्येक कृतीतून दाखवून देत आहे. नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्येही हे दिसून आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवत भारतीय जनता पक्ष (भाजप) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेवर कुरघोडी करत शिंदे गटाने या निकालांमध्ये थेट तिसरे स्थान मिळवले. निवडणूक निकालांबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलल्या ट्विटमध्ये ‘उद्धव ठाकरे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
काय म्हटले आहे ट्विटमध्ये
ह्यराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल.शिवसेना- भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे गट उल्लेख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटबरोबरच एक आभाराचे एक पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. सोबतच त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे पक्षीय बलाबल दिले असून त्यात उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.