29 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारण“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”

“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”

Google News Follow

Related

विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) महायुतीच्या आमदारांना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी संघाच्या मुख्य कार्यालयात निमंत्रित केले होते. यानंतर महायुतीच्या घटक पक्षातील भाजपा आणि शिवसेना नेत्यांनी संघाच्या मुख्य कार्यालयात हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही हजर होते.

नागपूर येथील रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून महायुतीच्या आमदारांनी येथे हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गैरहजर होते. रेशीमबागेत संघाचे बौद्धिक झाले. त्यात महायुतीचे आमदार उपस्थित होते. सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे आमदार स्मृती मंदिरात पोहचले. आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरएसएसचे कौतुक केले. तसेच आपली सुरूवातदेखील संघाच्या शाखेतूनच झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “रेशीम बाग येथे पहिल्यांदा आलेलो नाही. संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझं नातं लहानपणापासूनचं आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण हे सुरू झालं. संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे हे संघाच्या संघ परिवाराकडून शिकावं. कोणत्याही प्रसिद्धिची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. देशभरात संघाच्या पाच लाख शाखा आहेत. १९२५ रोजी संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केली. पुढच्या वर्षी त्याला १०० वर्ष पूर्ण होत आहेत हे विशेष आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे, पदभार स्वीकारला!

आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी

स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…

कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…

भाजपा आमदार अतुल भातखळकर हे ही संघाच्या मुख्यालयात उपस्थित होते. अतुल भातखळकर यांनी फोटो पोस्ट केले असून म्हटले आहे की, ज्येष्ठ संघकर्मींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रेशीमबाग परिसरात आज भाजपाच्या आमदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्रजींचेही आगमन झाले होते. त्यांच्याशी बोलणे झाले. सकाळच्या गुलाबी थंडीत सगळ्यांचा मूड अगदी प्रसन्न होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा