रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले प्रत्युत्तर

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. रिक्षावाला सुसाट आहे, थांबत नाही. ब्रेक नसेल तर अपघात होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडविली होती. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.

एक रिक्षावाला ते मुख्यमंत्री असा कौतुकास्पद प्रवास एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. आपल्या ४० आमदारांसह बाहेर पडल्यामुळे शिवसेना डबघाईस आलेली असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना सोबत ठेवले. संधी येताच सत्ता मिळविली. त्यांच्या या बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. तेव्हापासून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका करत ते गद्दार आहेत, ती प्रेत आहेत, शवागारात ठेवू वगैरे अश्लाघ्य टीका करायला प्रारंभ केला. उद्धव ठाकरे यांनी तर दाढीवाला असाही एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला.

हे ही वाचा:

उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

एकनाथ शिंदे ४० आमदारांसह विधान परिषद निवडणुकीनंतर लगेच बाहेर पडले. ते कुणालाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी हे सगळे आमदार नॉट रिचेबल आहेत हे कळल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. पण एकनाथ शिंदे त्यावर वारंवार बोलत नव्हते. त्यांनी संयम राखला पण आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार व स्वतः शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत.

Exit mobile version