शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणादरम्यान किंवा माध्यमांसमोर बोलताना बंडखोर आमदारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत आहेत. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “या आरोपावर मी असं बोलू शकतो की, जो राष्ट्रवादी और काँग्रेस के जंजिरो में अटके है, वो खंजीर खुपसने की बात ना करे. खंजीर कोणी खुपसलं हे मी योग्य वेळ आली की सांगेल,” असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
“आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहोत आणि महाराष्ट्रच्या जनतेने ते स्वीकारलं आहे. राज्यातून आणि जिल्ह्यातून मोठं समर्थन भेटत आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
पर्समधून बाळाला पळवून नेणारी नर्स ताब्यात
“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”
द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
“बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते. बाळासाहेब आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आहे. हे अडीच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, त्याची दुरुस्ती आता आम्ही करत आहोत. कारण निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने युती केली होती,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.