लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीमध्ये शिवसेनेचा मेळावा ठाणे लोकसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
“ज्यावेळी ठरवतो त्यावेळी करेक्ट कार्यक्रम करतो. दोन वर्षापूर्वी आपण करेक्ट कार्यक्रम केला. आता फक्त विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे,” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. “महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसांचे सरकार आहे. आपले सरकार सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करते. आज देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. दावोसच्या दौऱ्यावर असताना अनेक देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारले होते,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी १ लाख ३७ हजार कोटींच्या उद्योग आले होते. त्यातील काम ८० टक्के झाले. त्यानंतर दुसऱ्यावेळी ३ लाख ७३ कोटींचे करार झाले आहे. त्यामुळे राज्य उद्योगस्नेही झाले आहे,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दाखवला आहे.
“गडचिरोली भाग नक्षलवादी असून तेथे सुरजागडचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक अडचणी आल्या. मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला नाही. डीजी आणि पोलिसांनीही सपोर्ट केला नाही. म्हणाले की, हल्ला होईल, नारगरिक मारले जातील. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते, नक्षल मोठा की सरकार मोठे? जर तुम्हाला प्रकल्प करायचा नसेल तर मी स्वत: तेथे जाऊन प्रकल्प सुरु करेल. त्यानंतर मी तेथे जाऊन प्रकल्प सुरु केला. आज १० हजार लोक त्या ठिकाणी काम करत आहेत,” असं भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’
इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!
‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’
“गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात काम करु शकलो. कारण हे राज्याचे काम आहे. तेथील नक्षलवाद कमी झाला असून काही नक्षलवादी मध्य प्रदेशमध्ये गेले. त्यावेळी काँग्रेसचे सरकार असताना त्यांना आश्रय देण्याचे काम करत होते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्येही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे ते नक्षलवाद्यांना ठोकून टाकतील,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.