दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठी खिंडार पडली असून खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रेवश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला. देवरा यांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाला आणि उद्धव ठाकरेंना सणसणीत टोले लगावले आहेत.

डॉक्टर नसतानाही मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. काही ऑपरेशन्स असे करायचे सुई पण टोचली नाही पाहिजे आणि कुठे टाकाही लागला नाही पाहिजे. परिस्थितीनुसार काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. आरोप प्रत्यारोप न करता आपलं काम करत राहायचं,” असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. आपल्याला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय दिलं असं मानणारे फार कमी लोक असतात. बाळासाहेब ठाकरे आणि मुरलीधर देवरा हे त्यापैकी होते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच देवरा यांच्यासारख्या व्हिजन असणाऱ्या नेत्याची गरज असल्याची एकनाथ शिंदे म्हणाले.  एक, अभ्यासू सयंमी नेता आपल्या मिळाला आहे. हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा..

लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

“काही लोक कल्याण लोकसभा मतदार संघात जाऊन म्हणाले यांना साफ करा पण लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्याला कशाला साफ करतील. लोक तर घरी बसणाऱ्याला साफ करतील,” असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. “काही लोक म्हणतात, हेलिकॉप्टरने जावून शेती करणारा शेतकरी बघितलाय का? पण मी म्हणतो, मी मुख्यमंत्री आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. गाडी चालवून आठ तास का वाया घालवू? त्या वेळेत मी हजारो फायलींवर सह्या करु शकतो ना.. त्यामुळे हेलिकॉप्टरने जावून शेती करतो. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करत नाही,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

Exit mobile version