तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना केलेल्या संबोधनानंतर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दिल्लीत महाराष्ट्र सदनात त्यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही आम्हाला आम्हाला बाप चोरणारे बोलता मग तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हणायचे का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महिलांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या भल्याचे कंत्राट मी घेतले आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते की, आम्हाला अस्मान दाखविण्याची काही लोक भाषा करत आहेत पण  तुम्हाला ३ महिन्यांत अस्मान दाखविलेआहे, हे विसरू नका.  महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे मोठे काम आम्ही केल्याचेही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळाने कोरोनानंतर हाताळले विक्रमी १ लाख ३० हजार प्रवासी

गल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत

लष्करातून ब्रिटीश काळातील चिन्हे पुसणार

न्हावा शेवा बंदरात २० टन हेरॉईन जप्त

 

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी महाराष्ट्रात खळबळ उडविली होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हेच भाजपाच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री झाले.

उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारताना एकनाथ शिंदे गटाला मिंधे अशी उपमा दिली होती त्यावर खोचक प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले. ते म्हणाले की, आम्ही मिंधे नाही आम्ही बाळासाहेबांचे खंदे आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आम्ही करत आहोत. तुम्ही मात्र त्या विचारांना तिलांजली दिलीत.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर देताना असेही म्हणाले की, आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो म्हणूनच तुम्हा ठेचले.

 

Exit mobile version