‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या सभेत केला घणाघात

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केले. गद्दार, खोके या शब्दांचा वारंवार वापर करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, होय गद्दारी झाली आहे १०० टक्के बरोबर आहे पण गद्दारी ती २०१९ला झाली. ती निवडणूक लढवल्यावर जी आघाडी केली, त्याचवेळी गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी, गद्दारी केली, राज्यांतल्या मतदारांशी गद्दारी केली.

शिंदे म्हणाले की, लोकांनी शिवसेना भाजपा युतीला निवडून दिलं. त्यांचं त्यांचं सरकार स्थापन होईल अशी लोकांची अपेक्षा होती. पण निवडणुकीत बाळासाहेबांचा फोटो दुसऱ्या बाजुला पंतप्रधान मोदींचा फोटो लावला होता की नाही. मग लोकांनी युती म्हणून मतदान केलं. पण त्यांना अव्हेरलं. म्हणून तुम्ही बेईमान केली आहे, तुम्ही गद्दारी केली आहे जनतेशी आणि आम्ही केलली गद्दारी नाही हा गदर आहे गदर म्हणजे उठाव, क्रांती. हे महाराष्ट्राने जाणलेले आहे. म्हणून गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत छातीठोकपणे सांगू शकतो. त्यांचे विचार विकले बाप चोरणारी टोळी म्हणता. तुम्ही बापाचे विचार विकले त्याला काय म्हणायचे एक मर्यादा असते सहन करण्याची सत्तेसाठई हिंदुत्वाला तिलांजली दिली मग खरे गद्दार कोण जनतेला समजलं म्हणून जनता आहे आमच्यासोबत जनसागर बघा.

हे ही वाचा:

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

खड्ड्यात लपवलेले ४० लाख हस्तगत

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मारला मर्मभेदक शब्दबाण

येस बँकेच्या ‘एटीएम’ने स्वीकारल्या खेळण्यातल्या नोटा

शिंदे यांनी सांगितले की, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता मनातला गोंधळ संपला असेल. अथांग जनसागर उसळला आहे. आणि खरी शिवसेना कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्थानाला या महासागराने दिलेले आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत कुठे आहेत मला वाटते यापुढे असा प्रश्न कुणालाही पडणार नाही. या गर्दीने ते सिद्ध केलेले आहे.

जयदेव ठाकरेंनी घेतली शिंदेंची भेट

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे हेदेखील या सभेला खास उपस्थित राहिले. शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आणि हे एकनाथ आहेत, पण त्यांना एकटे नाथ करू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. जयदेव ठाकरे यांच्यासोबत स्मिता ठाकरे, निहार ठाकरे ही ठाकरे कुटुंबातील मंडळीही विशेष करून उपस्थित होती. त्याची जबरदस्त चर्चा झाली. चंपासिंग थापा यांनीही स्टेजवर उपस्थिती दर्शविली. त्यांच्याविषयीही एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक उद्गार काढले.

शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला करताना सांगितले की, हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, तिलांजली दिली आणि मग सांगा तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा अधिकार उरतो का, बोलण्याचा तरी अधिकार उरलाय का. हजारो शिवसैनिकांनी घाम, रक्त सांडून पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वाकांक्षेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने पक्ष चालवायचे तुम्ही राष्ट्रवादीच्या हाती गहाण टाकला रिमोट कंट्रोल. त्यांच्या तालावर नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागलात.  बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हरामखोर असा उद्धार केला, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. त्यातून वेदना झाल्या असतील बाळासाहेबांना म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी ही भूमिका घेतली. जाहीरपणे घेतली. लपूनछपून घेतली नाही. तीन महिने राज्यभर फिरतो आहे. लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

शिंदे यांनी हे स्पष्ट केले की, आम्ही जे केलं राज्याच्या हितासाठी, शिवसेनेसाठी म्हणून सांगतो की, ही शिवसेना ना ठाकरेंची एकनाथ शिंदेची. ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांचीच शिवसेना या तमाम शिवसैनिकांचीच शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही अणि सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण हे सगळे बाळासाहेबांचे सैनिक आहोत निष्ठावान, धगधगते विचार धमन्यांमध्ये भिनलेले आहेत ते कुणआलाही काढता येणार नाहीत. बाळासाहेबांचया विचारांचे विचार जनसमुदाय शिवसैनिक आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. वारसा हा विचारांचा असतो. आम्ही बाळासाहेबांचा वारसा जीवापाड जपला आहे. विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहेत हे महाराष्ट्राला समजलेले आहे. आम्हाला गेल्या दोन महिन्यात गद्दार, खोके तिसरा शब्दच नाहीत बाकी तरी बोला. केलं नाही तर बोलणार काय?

Exit mobile version