नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असून अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषषद सभागृहात बोलताना विरोधकांवर निशाणा साधत चौफेर फटकेबाजी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “परभणी, बीड, कल्याण असो हे राज्य कायद्याचे आहे. न्याय होणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सविस्तर उत्तर दिले आहे. गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. मविआ सरकारमध्ये मंत्री असताना मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास दानवे यांना माहित आहे पण त्यांना बोलता येत नाही. पुर्वी ‘तुम लढो में कपडे सांभालता हूँ’ अशी अशी स्थिती होती. आता ‘तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ’ अशी स्थिती आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.
“विधानसभेत मिळालेलं यश हे अनपेक्षित असून हा ईव्हीएम घोटाळा नाही तर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. विरोधक खोटेनाटे आरोप न करता जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतील ही अपेक्षा होती. सभागृहात कमी पण माध्यमांसमोर बोलण्यात विरोधकांनी धन्यता मांडली. आम्ही आरोपाला आरोपाने नव्हे कामातून उत्तर देऊ. निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले जनतेला काम करणारे लोक आवडतात. जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवते,” असा उपरोधिक टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
“राज्यातील प्रकल्पांना विलंब झाला हे कुणामुळे याचा विचार विरोधकांनी करावा. विकासकामांना स्पीड ब्रेकर लावणारे, योजना बंद पाडणारे कोण याचेही उत्तर शोधावे. आम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सुरू झाले. २० योजनांना चालना दिली आणि त्याची पोचपावती जनतेने दिली. इतक्या वेगाने निर्णय, कल्याणकारी योजना आम्ही आणल्या,” एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा..
पाकमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ची केंद्रे सोयीसुविधांनी सुसज्ज; फ्रेंच मॅगझिनमध्ये धक्कादायक खुलासे
उपमुख्यमंत्री शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट
निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ; खटला चालवण्यास नायब राज्यपालांची मंजुरी
रशियातील कझान शहरात ड्रोन हल्ला; तीन इमारतींना केले लक्ष्य
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मविआ काळात औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर होता. आमच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात नंबर वन आला आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के महाराष्ट्रात आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातून उद्योग पळाले असं फेक नेरिटिव्ह विरोधकांनी पसरवलं. पण, पुराव्यानिशी बोलेन की जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग खात्याने काढली. श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.