छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला वज्रमूठ असे नाव देण्यात आले होते. त्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, वज्रमूठ म्हणजे चांगले लोक येतात त्यांची मूठ अशी अपेक्षा असते. पण ही तर वज्रझूठ आहे. सत्तेला हपापलेले लोक आहेत. सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण सावरकरांचा अपमान करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत. त्यांना पाठीशी घालणे, त्यांच्यासोबत बसणे ही कसली वृत्ती आहे. बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती पण तिथे आज बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांची सभा होते आहे हे दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले सरकार स्थापन केलेले असताना हे शिवधनुष्य आम्हाला शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मिळाले. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज, आईभवानी, बाळासाहेब ठाकरे, धर्मवी आनंद दिघे यांचा आशीर्वादच आम्हाला मिळाला.
हे ही वाचा:
चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार
बिहारमध्ये रामनवमीला झालेल्या दंग्याचे पडसाद कायम; गोळीबारात एक मृत्यू
राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत
पोलाद उत्पादनात ‘सेल’चे विक्रमी उत्पादन
९ एप्रिलला अयोध्या दौरा
लवकरच अयोध्येला जात असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. अयोध्येला कार्यकर्ते आमदार, खासदार, सहकारी मंत्री पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन ९ एप्रिलला जाणार आहोत, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, आमदार आणि मंत्र्यांना विमानातून उतरावे लागल्यामुळे दर्शनाची संधई हुकली होती. म्हणून ९ तारखेला जाणार आहोत. प्रभू रामचंद्र, अयोध्या हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. अयोध्येकडे राजकारण म्हणून पाहणार नाही. आम्ही तिथे शरयू नदीवर आरती करणार आहोत. बाळासाहेबांचे स्वप्न होते. राममंदिर उभारले जावे ही रामभक्तांची देशवासियांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. तिथेही आम्ही भेट देऊन. महाराष्ट्राचा खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडे आम्ही पाठवत आहोत. धर्मवीरांनी चांदीची वीट पाठवली होती.