मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय कुठे असणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचा पत्ता समोर आला आहे.

मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार उठाव करत भाजपासोबत सत्तेत आले. तसेच त्यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. शिवसेना कोणाची याचा वाद न्यायालयात सुरू असून काही दिवसांपूर्वी दादर येथे मुख्य कार्यालय बनवणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचा पत्ता समोर आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून जारी केलेल्या नियुक्ती पत्रावर दादरच्या शिवसेना भवनाऐवजी ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमचा पत्ता देण्यात आला आहे. उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अनेक शिवसेनेच्या आमदारांचा, खासदारांचा, पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं कार्यालय कुठे असेल अशा चर्चा सुरू होत्या. दादरमध्ये कार्यालय असेल अशा चर्चा होत्या पण आता ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या नव्या कार्यलायची निवड केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पहिले विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्त जाहीर करताना त्यांनी जे पत्र प्रसिद्ध केलं त्यात त्यांचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रम असा पत्ता लिहिण्यात आला आहे. आनंद आश्रम म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यालय.

हे ही वाचा:

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्येच आपले कार्यालय उभारून या कार्यालयातून एकनाथ शिंदे हे स्वत: जनतेच्या समस्या जाणून घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांचे कार्यालय म्हणजे प्रतिसेना भवन नाही तर मुंबईकर नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी हे कार्यालय उभारण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Exit mobile version