“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”

धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळालं नाही, याची खंत वाटते.

“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”

निवडणूक आयोगाने सोमवार, १० ऑक्टोबर रोजी निर्णय देत उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. अद्याप एकनाथ शिंदे यांना कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त केली आहे.

धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळालं नाही, याची खंत वाटते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली होती आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आमच्या पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

मशाली या अन्याया विरुद्ध पेटवल्या गेल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी देखील मशाली पेटवल्या होत्या. आता हे अन्याया विरोधात मशाली पेटवत आहेत का? हे पहावं लागेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बहुमत ज्याच्याकडे असते त्यांना चिन्ह मिळते. आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितले होते. पण ते आम्हाला मिळाले नाही याचे दुःख आहे. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे, अशा भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

मेरीटवर आम्हाला चिन्ह मिळायला हवे. विधानसभेत आणि शिवसेनेच्या ७० टक्केपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पांठिबा दिला आहे. बहुमताचे आकडे आम्ही सादर केले आहेत. समोरच्यांनी मात्र बोगस एफीडेव्हिट सादर केले आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

Exit mobile version