मास्टरस्ट्रोक…. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री!

मास्टरस्ट्रोक…. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री!

भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मास्टरस्ट्रोक लगावला. एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शपथविधी होणार मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा जोरात सुरू असताना राजभवनात सरकार स्थापनेचा दावा दाखल केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले आणि अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशालाही आश्चर्याचा धक्का बसला. पण ही घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले अशी चर्चा सुरू झाली.

गेल्या काही दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती ते नवे सरकार आता स्थापन होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे ३५-४० शिवसेना आमदारांसोबत सुरत आणि मग गुवाहाटी येथे जात महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजविली होती. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी उलथापालथ झाली आणि अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त होत होता, पण राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि महाराष्ट्र आणि देशही स्तब्ध झाला. भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहेत. शपथविधी मात्र एकनाथ शिंदे यांच्या एकट्याचाच होणार आहे.

हे ही वाचा:

उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही

एकनाथ शिंदे यांनी प्रथम सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांशी चर्चा केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यंमत्री होतील अशी घोषणा केली आहे. तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार आहेत, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.

Exit mobile version