30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणएकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

पाच प्रस्ताव मान्य

Google News Follow

Related

मंगळवारी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना या पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक होऊन यात सर्व आमदार, खासदार आणि इतर शिवसेना नेते उपस्थित होते. याच बैठकीत शिवसेनेचा नेता म्हणून आम्ही त्यांच्या स्वीकार करतो  असा निर्णय झाला. दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच पक्षविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

बैठकीतले महत्वाचे प्रस्ताव
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव
चर्चगेट स्थानकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे
यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांसाठी मराठी विद्यार्थ्यांना भक्कम पाठिंबा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
स्थानिक मराठी ८० टक्के तरुणांना राज्यातल्या प्रकल्पांमध्ये रोजगार देणे   हे पाच प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर , लोकसभा सचिवालयाने आदेश काढून संसद भवनातील कक्ष क्रमांक १२८ हे शिवसेनेच्या संसदीय पक्षला कार्यालय म्हणून दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असणाऱ्या शिवसेना गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी या गटाने सर्व माध्यमांना शिवसेना असेच म्हणण्यास सांगितले असून पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी मीडिया हाऊस ला तसे पात्र जरी केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिडेंगात असे ना संबोधता शिवसेना असेच आता म्हणावे

बैठकीनंतर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्व खालील बैठकीत शिंदे हेच आमचे नेते राहतील , आणि सरकारच्या कामकाजावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर पक्षाचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदेंकडेच असतील असेही ते पुढे म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा