नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले

नरेश म्हस्के १,४०,९५७ मतांनी विजयी

नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकाल समोर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यात नरेश म्हस्के यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांचा गड राखण्यात यश मिळाल्याचं चित्र दिसत आहेत. ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. अखेर त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकून विजयाचा गुलाल उधळला आहे.

नरेश म्हस्के यांना ५,०४,१७७ इतकी मत पडली आहेत तर राजन विचारे यांना ३,६३,२२० इतकी मत पडली आहेत. त्यामुळे नरेश म्हस्के हे १,४०,९५७ मतांनी विजयी झाले आहेत.

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. हा गड राखण्यात शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिवसेनेट उभी फूट पडताच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर, एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला. नरेश म्हस्के यांनी यात बाजी मारली.

हे ही वाचा:

सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल

इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत

अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!

शिवसेनेची सर्वाधिक शक्ती असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत रंजक झाली. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा होती. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली होती. भाजपाकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडे ठेवली होती आणि आता ही जागा मिळवलीही.

Exit mobile version