मुख्यमंत्री शिंदेंनी मला तिजोरीची चावी दिली ते मला म्हणाले , बंजारा समाजासाठी तुम्ही हि तिजोरी खोलून टाका तुम्हाला अर्थमंत्री केले त्यामुळे आता पैशांची कमतरता पडू देणार नाही ५३७ कोटी रुपयांचा आराखडा तैयार केला असून आता मी तुम्हाला शब्द देतो की, काम थांबू देणार नाही असे आश्वासन सुद्धा ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांनी आज बंजारा समाजाला दिले. मुख्यमंत्रीसुद्धा या कार्यक्रमास उपस्थित असल्यामुळे अनेक मह्तवपूर्ण घोषणा या कार्यक्रमात झाल्या. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज झाले. बंजारा समाजाचे स्वप्न आज पूर्ण झाले, असे पुढे मुख्यमंत्री फडणवीस बंजारा समाजाच्या महामेळाव्यात बोलत होते.
बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले. सेवालाल महाराजांवर प्रेम करणारे लोक पोहरागडावर आले आहेत ,इकडे आल्यास काशीला आल्यासारखे वाटते असेही पुढे फडणवीस म्हणाले. पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे काशीचा नवीन रूप देऊन कायापालट केला त्याचप्रमाणे आम्ही बंजारा समाजाच्या काशीचे कायापालट करणार आहोत. मागील सरकारने सेवालाल महाराजांवर एकही पैसे खर्च केला नाही म्हणून त्यांना सेवालाल महाराजांनी घरी बसवले असा टोलाही त्यांनी लगावला.
हे ही वाचा:
मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली
राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले
फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय
महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय
मागल्या वेळी आमचे सरकार असताना बंजारा समाजाच्या गोर बोली या भाषेच्या संवर्धनासाठी अकादमी सुरु करायची होती आता आपले सरकार पुन्हा आले असल्यामुळे गोर बोलीचे संवर्धन नक्की केले जाईल राज्य सरकारकडून अडीचशे कोटी खर्चून रास्ता टियार केला जात असून आत भक्तांना त्रास सहन करावा लागणार नाही. मोदीजींनी बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांकरिता नवीन महामंडळ सुरु केले आहे. त्यामुळे आता बंजारा समाजाचा विकास नक्की होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
मागील काळात मोदिंना विनंती केली होती वर्धा नांदेड लोहमार्ग पोहरागड कडून न्यावा अशी आपल्या समाजाची मागणी होती ती मागणी आता पूर्ण होणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात पोहरागड रेल्वे मार्गासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामुळे लवकरच आपण पोहरागडला रेल्वे पोचणार आहे. बंजारा समाजाचा आता महामंडळामार्फत विकास करू. तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे दिल्यामुळे हि तिजोरी आपण महामंडळाची रिकामी करण्याचे काम आपण करू असेही उपमुख्यमंत्री म्हणाले