एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या ४० हुन अधिक आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना एक पत्र पाठवले होते. ज्यामध्ये बारा आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे त्या पत्रात नमूद होते. आधी बारा आमदारांवर आणि उरलेल्या आमदारांवरसुद्धा लवकर कारवाईची मागणी करू, असंही त्या पत्रात लिहले होते.

यादरम्यान, शिवसेनेच्या या कारवाईच्या मागणीवर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबद्दल एक ट्विट केले आहे. बारा आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून, तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर उलट एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेवर कारवाईची मागणी केली आहे. बारा आमदारांविरोधात कारवाईची मागणी केल्यांनतर त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं की, कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे बेधडक ट्विट शिंदे यांनी केले आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेच्या बंडाची खेळी नेमकी कुणाची..

‘राज्यातील घटनांशी भाजपाचा संबध नाही’

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

… तर मविआतून बाहेर पडू- राऊत

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या ४६ आमदार आहेत. यामध्ये ३७ शिवसेनेचे आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आमदारांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे, एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version