होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे; कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे; कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत झालेल्या भाषणात आपल्यावर आरोप करणाऱ्या सर्वांची खबर घेतली. विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, रोज सगळे आम्हाला गद्दार गद्दार म्हणत होते. खोके खोके सुरू होते. कंत्राटी मुख्यमंत्री असा माझा उल्लेख झाला आहे. नारायण राणेंनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांबाबत उल्लेख केला होता, त्यांना तर तुम्ही जेलमध्ये टाकले. जेवायला बसलेल्या केंद्रीय मंत्र्याला जेवू न देता जेलमध्ये टाकले. या देशाच्या लोकशाहीत नियम, कायद्याप्रमाणे, बहुमत सिद्ध करून आम्ही बसलो आहोत. कुठलेही कृत्य आम्ही करणार नाही कायद्याविरोधात. वैचारिक पातळी इतकी घसरलेली आहे. मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले आहे. होय, मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे. राज्य समृद्ध करण्याचे कंत्राट घेतले आहे, गोरगरीब जनतेचे अश्रु पुसण्याचे कंत्राट घेतले आहे, लोकांचे दुःख दूर करण्याचे कंत्राट, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे, बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचे कंत्राटही मी घेतले आहे.

अजितदादा तुम्ही पण पोराटोरांसोबत होतात

एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही शरसंधान केले. दादांची दादागिरी चालणार असे म्हणताना त्यांनी या खोके आंदोलनात सहभागी झालेल्या अजित दादांवरही टीका केली. ते म्हणाले, तुम्ही पण त्या पोराटोरांसोबत ५०-५० घेऊन होतात. पहिल्या काही दिवस तुम्ही आंदोलन करत होतात, तेव्हा आम्ही आलो होतो का तिथे. पण आमचे लोक घोषणा देत होते. तेव्हा त्यांच्या मागे काही लोक गेले. मिटकरी कळ काढायला लागले. आमच्या घोषणा झाल्यावर जायचे ना!

हे ही वाचा:

देशसेवेचा निर्धारू राजगुरू !

रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं

कोरोनामुळे कोलमडलेली राज्याची अर्थव्यवस्था शेतीने सांभाळली

बीडीडी चाळीतील पाेलिसांना मिळणार १५ लाखांत घर

 

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सांगितले की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. निवडणुकीत म्हणायचे बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादी आपला शत्रू आहे. जेव्हा जवळ करायची वेळ येईल तेव्हा माझे दुकान बंद करेन. बाळासाहेब मोदींचा फोटो लावून मते मागितली. मेजॉरिटी मिळाली. अनैसर्गिक आघाडी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी आम्ही कुठे बेईमानी केली का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरा. तुम्हाला नाही बोललो मी असेही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांकडे पाहात म्हटले.

माझ्या कलागुणांना वावच दिला नाही

एकनाथ शिंदे यांनी काही कविताही ऐकविल्या तेव्हा त्यांना आठवलेंची आठवण कुणीतरी करून दिली. त्यावर ते म्हणाले की, माझ्याकडेही टॅलेंट आहे. मला कामच करू दिले नाही. माझ्या कलागुणांना प्लॅटफॉर्म दिला नाही. त्यावर सभागृहात हशा पिकला.

Exit mobile version