उद्धव ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर भाषण पूर्ण होत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला. त्या भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची हजेरी घेतली.
ते म्हणाले की, आता भाषणात मला कटप्पा म्हणाले. कटप्पा पण स्वाभिमानी होता. दुटप्पी नव्हता तुमच्यासारखा. आम्ही शिवसैनिकांना त्रास देत आहोत, असे तुम्ही म्हणता. पण शिवसैनिकांना माहीत आहे, आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत. तुमच्या डोळ्यासमोर शिवसैनिक जेलमध्ये गेले, आनंद पवारचे अश्रु तुम्हाला दिसले नाहीत. शिवसैनिक तडीपार होतात, त्यांना मोक्का लावतात. मी जाहीरपणे सांगतो की, कुणावरही अन्याय करून त्याला पक्षात प्रवेश द्यायचा नाही. असले धंदे तुम्ही केले आम्ही नाही करणार.
कुठे फेडाल हे पाप?
शिंदे यांनी सांगितले की, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देईन असे म्हणता पण पक्षात राहिलेत किती. हे सगळे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. अशी संघटना वाढणार नाही. कोथळा काढायची भाषा. किती केसेस आहेत तुमच्यावर. तुमच्यासाठी केले सगळे त्यांना गद्दार म्हणता. कुठे फेडाल हे पाप. मुलगा कार्ट. नातू नगरसेवक पदासाठी डोळे लावायला बसलाय म्हणता. तुमंच अधःपतन सुरू झालं. दीड वर्षाच्या बाळावर पण टीका करता. तुमचा मुलगा मंत्री झाला. एक ग्रामीण भागातला झाला नसता का. पायाखालची वाळू सरकली म्हणून हे बोलत आहात.
बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची
एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी मंचावर ५१ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पण त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचाही समावेश होता. मध्यभागी ठेवलेल्या या खुर्चीवर चाफ्यांची माळ ठेवण्यात आली होती. तिकडे उद्धव ठाकरेंच्या सभेत मात्र संजय राऊत यांची रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती. मागे उद्धव ठाकरे यांनी नेस्को गोरेगाव येथे सभा घेतली होती, त्यातही संजय राऊत यांची रिकामी खुर्ची ठेवून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला होता. सध्या संजय राऊत मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.
शिंदेंनी उद्धव यांच्यावर जोरदार प्रहार करताना म्हटले की, लाज तर तुम्हालाच वाटायला पाहिजे होती. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही शपथ घेतली. छातीवर दगड ठेवून बोलतो. बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झालाच नसता. नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवले. कुठे फेडणार पाप. तुमचीच लायकी तुम्ही काढून घेता.
उद्धव ठाकरे यांनी केली होती दिघेंच्या प्रॉपर्टीची चौकशी
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खडा सवाल उपस्थित केला. तुमचा त्याग काय, पहाटे ३-४ वाजता मी घरी जात असे. बाप कामाला जायचा तेव्हा मी उठायचो. आमची भेटही हो नव्हती. कुटुंबियांनी पण त्याग केलाय. त्याची टिंगल करताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही कुठल्या अधिकारात घेता. आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. धर्मवीर आनंद दिघेंची आठवण आता आली? अरुणा ताई गडकरी. त्यांनी मला फोन केला. मला म्हणाल्या आनंद म्हणायचा, एक दिवस ठाण्याचा मी मुख्यमंत्री करणार. दिघे गेल्यावर मी तुम्हाला भेटलो. तेव्हा मला वाटले दिघेंनी कसा पक्ष वाढवला, याविषयी विचाराल पण तेव्हा तुम्ही विचारले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे आहे. त्यांचे बँक खातेही नव्हते. बाळासाहेबांचे शपथ घेतो. पक्षात जे लोकप्रिय होतात, त्यांचे पाय कापता त्यातूनच पक्षाचे पाय कापले जातात. १९९५मध्ये मनोहर जोशी झाले तेव्हाच तुमची इच्छा होती राणेंना बाजुला करून तुम्हाला व्हायचे होते. काय सांगता इच्छा नव्हती म्हणून.