आपल्या पुत्राने, प्रवक्त्याने अश्लाघ्य भाषा वापरायची आणि दुसरीकडे समेटाची भाषा, याचा अर्थ काय?

आपल्या पुत्राने, प्रवक्त्याने अश्लाघ्य भाषा वापरायची आणि दुसरीकडे समेटाची भाषा, याचा अर्थ काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला परत येण्यासाठी भावनिक आवाहन करत आहेत. दुसरीकडे मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. यावरून एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे आमदार बंडखोर झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. अपशब्द देखील वापरले आहेत. यामुळेच एकनाथ शिंदे संतापले असून त्यांनी ट्विट करून याबद्दल बोलले आहेत. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

आम्ही लवकरच मुंबईला येऊ

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

एकीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आक्रम होऊन बंडखोर गटावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिंदे गटाला परत येण्याचा भावनिक आवाहन करत आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, परत या! आपण यातून नक्की मार्ग काढू, अशा प्रकारचे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत.

Exit mobile version