24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणमोट बांधणाऱ्यांची बोटच फुटली

मोट बांधणाऱ्यांची बोटच फुटली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरद पवारांवर टीका

Google News Follow

Related

राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचा विडा महायुतीच्या सरकराने घेतला आहे. आता राष्ट्रवादीही आमच्यासोबत आल्याने हे सरकार मोठ्या गतीने काम करत आहे. जनता सुज्ञ असून घरी बसणाऱ्या नेत्यांना घरी बसवते, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. तर, देशात विरोधी पक्षांची मोट बांधणाऱ्यांची बोट फुटली, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला.

नाशिकमधील  ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात शनिवार, १५ जुलै रोजी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील खरे निष्कलंक माणूस आहेत. मात्र, काहीजण त्यांना कलंक लावतात. त्यासाठी मन मोठे असावे लागते. खोट्या मनाच्या माणसांकडून ती अपक्षा केली जाऊ शकत नसल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मागील अडीच वर्षात आघाडी सरकारने मेट्रो, समृद्धी, कोस्टल रोड असे अनेक महत्वाचे प्रकल्प थांबवले होते. ते सर्व प्रकल्प आमचे सरकार आल्यानंतर लगेच मार्गी लावले आहेत. महायुतीचे सरकार हे अधिक वेगवान सरकार आहे. यावेळी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. महाविकास आघाडीची वज्रमूठ फूस झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र, ही वज्रमूठ सगळी झूठ ठरली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची मोठी वाताहत झाली. पंतप्रधानांच्या विरोधात एक नेता उभा राहू शकत नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका

शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत चांगले काम होत असताना काही जणांचे पोट दुखत आहे. पण या पोटदुखीवर डॉ. एकनाथ शिंदे हा रामबाण उपाय आहे. हा उपचार पचनी पडला नाही तर दादा सोबतीला आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला

रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश जनतेला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारायला नको हा आहे. सरकार जनतेच्या दारी पोहचवणे हा आमचा उद्देश असून कुठलाही भेदभाव न करता रामराज्य संकल्पना अंमलात आणणे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या अगोदरचे मुख्यमंत्री मला राजकारण, सहकार, शेती, अर्थसंकल्प यातले काही कळत नाही असे सांगायचे. शरद पवार यांनीही त्यांच्या पुस्तकात मुख्यमंत्र्यांना राजकारण कळत नाही, असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले. आमच्या सरकारला राजकारणही कळते, सत्ताकारणही समजते असा टोला त्यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा