आमचे २४३ सरपंच, आकडे तपासा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आव्हान

ग्रामपंचायतीतील निकालांचा मुख्यमंत्र्यांनी केला पर्दाफाश

आमचे २४३ सरपंच, आकडे तपासा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आव्हान

जवळपास ११६५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर त्यात भाजपाने पहिला क्रमांका मिळविला. मीडियामध्ये हे दाखवले जात असले तरी एकनाथ शिंदे गटाला मात्र चौथा क्रमांक मिळाल्याचे दाखविले जात होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे २४३ सरपंच निवडून आले आहेत. तेव्हा आकडेवारी तपासून घ्यावी. मीडियासमोरच निवडून आलेले लोक आहेत. त्यांनी खातरजमा करावी. काल १५० सरपंच आले होते. आणखी ५१ सरपंचही होते. उर्वरित सरपंचही येतील. ही संख्या आणखी वाढणार आहे. व

एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर हे सरपंच आले होते. त्यांच्यासमोर भाषण करतानाच एकनाथ शिंदे यांनी ही आकडेवारी सांगितली.

ग्रामपंचायतीतील वास्तव समोर आले पाहिजे. काल १५० सरपंच आले होते. आज ५१ आलेत आणखी सरपंच येतील. एकूण २४३ सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आले आहेत. तुम्ही त्यांची खातरजमा करा. तीनच महिने आम्हाला झाले. आमच्या कामावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. ग्रामीण भागातही लोकांना आमचा विश्वास वाटतो. याचा फायदा येणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना भाजपा युतीला यश मिळणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजपा नंबर आहे. पण आमच्या बाबतीत चुकीचे आकडे दाखविण्यात आले. त्यामुळे तुम्ही सरपंचाचे नाव माहीत करून घ्या आणि खरे आकडे दाखवा.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

 

भाजपाने या ग्रामपंचायत निवडणुकात ८९७ पैकी ४०० ग्रामपंचायतीत यश मिळविल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र सर्व वाहिन्यांवर भाजपा नंबर वन दाखवताना ठाकरे गटाला दुसरा क्रमांक मिळाल्याचे दाखविले जात होते.

Exit mobile version