संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशिरा अटक केली. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरातून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर काल, ३१ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीत असलेल्या संजय राऊत यांच्या घरात ईडीकडून शोधमोहीम सुरू होती. संजय राऊत यांच्या चौकशीनंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेण्यात आले तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.

या चौकशी आणि छापेमारीदरम्यान संजय राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त

अ‍ॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असे ते म्हणाले. राम मंदिराच्या उभारणीसाठी एकनाथ शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं वाटतं. जो करेल तो भरेल. त्यामुळे राऊतांवर ही वेळ आली असावी, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

Exit mobile version