नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर उधळली स्तुतिसुमने

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यानंतर लगेचच कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभेसाठी जमलेल्या सोलापूरकरांना संबोधित केलं.

मोदी गॅरंटी फक्त कागदावर नाही; वास्तवात पण आहे

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी गॅरंटीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दपुर्तीची आठवण करून दिली. नरेंद्र मोदी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या शिलान्यासावेळी बोलले होते की, शिलान्यास आम्ही केला चावीही आम्हीच देणार, असं मोदी म्हणाले होते, यालाच म्हणतात मोदी गॅरंटी, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. देशातल्या लोकांनी गॅरंटी दिली आहे फिर एक बार मोदी सरकार और चारसौ पार, असं एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते समृद्धी महामार्ग, अटल सेतूचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं, मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या हाती यश

नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक ग्लोबल लीडर, व्हिजनरी लीडर मिळाले आहेत. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं, पण आज मंदिर पूर्ण होत आहे. करोडो राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. अबुधाबीतही मंदिर बनत आहे. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी करणार आहेत. साडेनऊ वर्षांपूर्वी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ती देशासाठी आशेचे किरणं होती. नरेंद्र मोदींच्या हाती यश आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

आर्या आबंकेर – सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘हृदय में श्रीराम’ गाण्याची मोदींनी घेतली दखल

अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर!

रामभक्तीत लीन जर्मन नायिका!

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वांनी सहभागी होणे, हेच असेल रामराज्य’

दावोसमध्ये पंतप्रधान मोदींचीचं चर्चा

“दावोस दौऱ्यावरून येताना ३ लाख ५३ हजार करोडचे एमओयुवर सह्या झाल्या. तिथे अनेकांना भेटलो पण, तिथेही सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव होतं ते म्हणजे नरेंद्र मोदी. तिथे ऑफिसर मिनिस्टर, उद्योजक सर्वांच्या तोंडी नरेंद्र मोदींचे नाव होते. मोदी सरकार पुन्हा देशात सरकार स्थापन करणार याची गॅरंटी त्यांना आहे. महाराष्ट्रातही डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version