28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणअजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत उपस्थित केले मुद्दे

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारपासून होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर काही आरोप केले, पण ते आरोप उथळ स्वरूपाचे आणि तथ्यहीन असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कसबा आणि चिंचवडच्या पोट निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उतरले यावर अजित पवार यांनी टीका केली होती. त्यावर ही पोटदुखी नेमकी कशामुळे आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. एकनाथ शिंदे यासंदर्भात म्हणाले की, मी पुण्यात होतो अजितदादांचे कार्यकर्तेही तिथे होते. आम्हाला तिथे लोकांचे प्रेम पाहायला मिळाले. मग अजितदादांना आता पोटदुखी का झाली. समस्या काय पोटदुखीची. तुम्हीही तिथे प्रचाराला आला होतात, मग आम्ही म्हणालो का तुम्ही का आलात म्हणून.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातल्या विकासाचे व धोरणात्मक मुद्दे याची चर्चा अधिवेशनात होईल. उद्योग व्यापार विधेयक, पोलिस सुधारणा अशी विधेयके आहेत. यात विरोधी पक्षांनीही चर्चा करावी. सकारात्मक मुद्दे मांडावेत सूचना मांडाव्या. अधिवेशनातून काहीतरी देण्याचा प्रयत्न युती सरकार करणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. अधिवेशन अर्थसंकल्पीय महत्त्वाचे आहे. जनतेच्या गरजा, भावना, राज्यातील समस्या मोठ्या प्रमाणावर जनतेला अपेक्षा असतात. जीवनात बदल झाले पाहिजेत, असा प्रयत्न आम्ही करत आहोत.

मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांनी चहापानावर नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता असे अजित पवार म्हणतात. पण त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. तेव्हा त्यांचा राजीनामाही घेण्यात आला नाही. मग अशा लोकांसोबत चहा पिण्याची वेळही आमची टळली. देशद्रोह मोठा आहे हे लक्षात घ्यावे.

अजित पवारांची परिस्थितीती वैफल्यग्रस्त आहे. तथ्य हवे. विरोधी पक्ष नेते आहात, उपमुख्यमंत्री राहिलेले आहात. घटनाबाह्य सरकार वगैरे का बोलता, असेही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

सावरकर म्हणजे मूर्तिमंत त्याग

मुले जन्माला घाला, म्हणत चीनमध्ये नवविवाहितांना नवनव्या ऑफर

शिंदे यांनी सांगितले की, वर्षा बंगल्यावर झालेल्या खर्चावर अजितदादा बोलतात. २ कोटी ३८ लाख इतका खर्च झाला म्हणून. महाविकास आघाडीचे सरकार असताना खूप पैसे खर्च केले जाहिरातींवर. २४५ कोटींची तरतूद होती. ६ कोटींची तरतूद अजितदादांच्या प्रसिद्धीसाठी केली होती. पण बोंबाबोंब झाल्यावर ती रद्द केली.

वर्षा बंगल्यात झालेल्या खर्चाबाबतही शिंदे म्हणाले की, वर्षा बंगल्यात राज्यभरातून लोक येतात. अडीच वर्षे वर्षावर ये-जा बंद होती. तिथे लोक आल्यानंतर त्यांना पाणी पण द्यायचे नाही का. आम्ही बिर्याणी वगरै देत नाही. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा