30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण‘धरम-वीर’ची जोडी भक्कमच!

‘धरम-वीर’ची जोडी भक्कमच!

‘सरकार आपल्या दारी’च्या निमित्ताने शिंदे फडणवीस पालघरमध्ये एकत्र

Google News Follow

Related

वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काही आलबेल नाही, असे म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना या दोन्ही नेत्यांनी पालघरमधील सरकार आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत उत्तर दिले. आमची मैत्री २५ वर्षांची आहे. आम्ही कालही एकत्र होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये फेव्हिकॉल का जोड है टुटेगा नही, असा विश्वास व्यक्त केला.

गेले दोन दिवस प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी शरसंधान केले होते. सरकार पडणार असल्याची भावना विरोधक बोलून दाखवू लागले. त्यामुळे पालघरमधील कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र येतात की नाही, त्यांच्यात काय बोलणे होते, त्यांची देहबोली कशी असेल यावरून सकाळपासूनच मीडियात चर्चा रंगली होती. हे दोन्ही नेते एकत्रच हेलिकॉप्टरमधून आले त्यावरूनही मतमतांतरे व्यक्त केली गेली नंतर एकाच गाडीतून ते गेले नाहीत त्यावरून मीडियाने शंका उपस्थित केली गेली.

पण शेवटी जेव्हा या दोन्ही नेत्यांची भाषणे झाली तेव्हा मात्र दोघांनीही विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत आपली जोडी भक्कम असल्याचे ठासून सांगितले. देवेंद्र फडणवीस प्रथम भाषण करताना म्हणाले की, पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमात लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ आपण घरपोच लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. दोन सरकारमधला फरक काय तर आधीचे सरकार हे सरकार आपल्या घरी, आता मात्र सरकार आपल्या दारी हा फरक आहे. एक सरकार स्वतःच घरी बसलं होतं. हे सरकार तुमच्या दारापर्यंत येऊन तुमचे अधिकार पोहोचविण्याचं काम करत आहे.

फडणवीसांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि मी हेलिकॉप्टरमधून आलो, तेव्हा एका पत्रकाराने विचारले, त्यावर मी म्हटले की, आमचा एकत्र प्रवास २५ वर्षांचा आहे. गेल्या वर्षभरात हे नाते आणखी घट्ट झाले आहे. कालही सोबत होतो, उद्याही राहू. खुर्च्या तोडण्याकरिता सरकार तयार केले आहे. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी सरकार स्थापन केलं आहे. म्हणून मला वाटतं वक्तव्यामुळे कुठेही या सरकारमध्ये काही होईल, इतके हे तकलादू सरकार नाही. कुणी आधी भाषण करायचं कुणी नाही यावरून एकमेकांची कॉलर पकडणारे आम्ही नाही. सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होत नाही. तोपर्यंत सरकार कार्यरत राहील.

हे ही वाचा:

हैदराबादच्या तरुणीची लंडनमध्ये ब्राझिलियन व्यक्तीकडून घरातच हत्या 

आशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार पाकिस्तान, श्रीलंकेत

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही युती स्वार्थासाठी नाही. २५ वर्षांपासून वैचारिक भूमिकेमुळे झालेली आहे. पण कुणीतरी त्यात मिठाचा खडा टाकला. तो खड्यासारखा बाजुला काढला. मनातलं सरकार स्थापन केलं. कितीही काही म्हटलं तरी दरी निर्माण होणार नाही. माझी आणि फडणवीसांची आताची दोस्ती नाहीए. १५-२० वर्षांपासून आम्ही आमदार असल्यापासून दोस्ती आहे. ही दोस्ती जीवाभावाची मैत्री आहे. बॉण्डिंग असे आहे की, फेव्हिकॉल का जोड है टुटेगा नाही. जय वीरू, धरमवीर की जोडी म्हणतात, ही युतीची जोडी आहे. ही स्वार्थासाठी झालेली नाही. जे स्वार्थासाठी एकत्र आले होते, त्यांना जनतेने बाजुला केले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आपल्या दारी या उपक्रमामागील भूमिकाही समजावून सांगितली. शिंदे म्हणाले की, अभिमानाने सांगीन सुरुवातीच्या मंत्रिमंडळात दोघेच होतो, पण सर्व कॅबिनेट बैठकांमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. वैयक्तिक लाभाचे निर्णय नाहीत. जनता केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेण्यात आले. आज पालघर जिल्ह्यातल्या पाड्यापाड्यातून लोक आलेत. शासन आपल्या दारी मधून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. २ लाख १२ हजार लाभार्थ्यांना २१२ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानातून हॉस्पिटलचं भूमिपूजन, पाणी योजनेचे भूमिपूजन केलं. १०-११ महिन्यापासून स्थापन झालेलं सरकार. सर्वसामान्यांच्या अनेक निर्णय आपण घेतले. ३००-४०० निर्णय घेतले. आज अनेक लोकाभिमुख कार्यक्रम होत आहेत.

फडणवीस म्हणाले की, ७५ वर्षांच्या निमित्ताने ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, असे आमचे उद्दीष्ट होते पण दीड लाख लाभार्थ्यांना लाभ देऊ असा निश्चय केला. आता तर २ लाखांपेक्षा अधिक लोकांना लाभ पालघरमध्ये मिळतो आहे. जनसामान्यांचे सरकार. लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. योजना अनेक असतात. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात देशात काही बदल केला असेल तर वितरण व्यवस्था बदलली. २०१४ आधी लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर लाभ द्यावा लागत होता, पण आता लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल. थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचण्याची व्यवस्था उभी केली. आता कुणीही मध्ये येणार नाही. लाभ देण्याची आवश्यकता नाही. लाभ घेण्याची प्रत्येकाला संधी असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा