फक्त १५ दिवस; खडसे भाजपात येणार!

स्वतःच दिली माहिती

फक्त १५ दिवस; खडसे भाजपात येणार!

एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सोडून एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याची अटकळ काही दिवसांपासून बांधली जात होती.अखेर ही अटकळ खरी ठरली आहे.याबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी माहिती दिली.येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, असा माझा प्रयत्न आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, असा माझा प्रयत्न आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले, ‘माझा भाजप प्रवेश हा चंद्रपूरमध्ये नाही तर दिल्लीला होणार आहे. दिल्लीहून ज्या दिवशी मला बोलावणं येईल त्यादिवशी माझा प्रवेश होईल.

भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नसल्याचे ते म्हणाले.मात्र, भाजपमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत, जे जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करताना तुम्ही भाजपमध्ये असायला पाहिजे होते, असे नेमही बोलले जायचे. तुम्ही आलात तर बरं होईल, अशी चर्चा वरिष्ठ नेत्यांबरोबर झाली. चार-सहा महिन्यांपासूनच त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. माझी राजकीय परिस्थिती पाहून मी निर्णय घेऊ शकत नाही, अशी विनंती मी त्यांना केली होती. आता त्यानुसार मी निर्णय घेतला आहे,’ असे एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा..

हैदराबादच्या लेडी सिंघम माधवी लता म्हणतात, असदुद्दीनला हरवणारच!

रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!

काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!

ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

ते पुढे म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करताना कुठलीही अट किंवा शर्थ ठेवली नाही. स्वगृही परत गेलं पाहिजे, असं मला वाटलं. भाजप हे माझे घर आहे. या घराच्या पायाभरणीपासून मी काही ना काही योगदान दिलं आहे. या घरात मी ४५ वर्ष राहतच होतो, पण काही नाराजीमुळे यातून बाहेर पडल्याचे ते म्हणाले.मात्र, आता ती नाराजी कमी झाली असून मी पुन्हा माझ्या घरात परत येत आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे देखील एकनाथ खडसेंनी आभार मानले आहेत.खडसे म्हणाले, ‘संकट काळात शरद पवारांनी मला हात दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता पक्षांतर करत असतानाची जी परिस्थिती आहे, ती मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातली, त्यांच्याकडून अनुकूलता आल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खडसेंनी सांगितले.

Exit mobile version