लहान मुल जेवाव म्हणून त्याचे आई- वडील त्याला एखादी गोष्ट सांगत असतात. त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असतो. आश्यर्यकारक काही गोष्ठी रंगवून सांगितल्या जातात म्हणजे ते मुल चार घास जास्त जेवेल, अशी त्या मागची भावना असते. अशीच एक गोष्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितल्याचं एका व्हिडीओ मधून दिसून आले. आणीबाणीतसुद्धा जनता एवढी संतापली नव्हती तेवढी आता संतापली आहे. जनतेचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. कधी निवडणुका होतात आणि या सरकार विरोधात कचा कचा बटन दाबून विरोधात मतदान करू अस लोकांना वाटत आहे, असं खडसे म्हणाले आहेत. यावरून जनतेचा नाही तर एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मनामध्ये किती राग आहे, किती द्वेष ठासून भरला आहे, हेच लक्षात येत. आजूबाजूची चार टाळकी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देतात याचा अर्थ सबंध जनता असा होत नाही. पण, खडसे यांची जी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मनामध्ये मळमळ आहे ती अशी अधेमध्ये बाहेर पडत असते.
सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवाय अलीकडे दुसरे एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रुपाने सरकारमध्ये बसले आहेत. या शिवाय हे सरकार तीन पक्षांचे आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्षही सहभागी आहेत. हे खडसे यांना माहिती असूनही त्यांनी टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. याचा अर्थ असा की रोष सरकारवर नाही तर त्यांचा रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष असण्याचे कारण काय तर आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना देवेंद्र फडणवीस यांना पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री केल. फडणवीस यांना नेता किवा मुख्यमंत्री करताना आपला का विचार पक्ष नेतृत्वाने केला नाही, यावर खर तर खडसे यांच्या सारख्या नेत्यांनी चिंतन करण्याची गरज होती. मात्र, तस न करता त्यांनी व्यक्तिगत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. पक्ष बदलला तरी त्यांचे फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पद्धत बदलेली नाही. जे ते पूर्वी करत होते तेच ते आजही करत आहेत. फडणवीस हे त्यांच्या कर्तुत्वाने मोठे झालेले नेते आहेत. त्यांच्याकडे असलेल्या गुणांचे कौतुक कॉंग्रेससह खडसे सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे नेतेसुद्धा करतात. प्रत्येकवेळी राजकीय चष्म्यातून बघायचं नसत. पण त्यासाठी खिलाडू वृत्ती लागते. त्याचाच आभाव खडसे यांच्याकडे दिसतो. व्यक्तिगत पातळीवर एखाद्याच्या ताब्बेतीवरून बोलण हे कुठल्या राजकीय असो किवा सामाजिक भाषेच्या संस्कृतीत बसत आणि अस बोलत असताना असणाऱ्या देहबोलीवरून आपण किती खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याची खिल्ली उडवतो, हे सुद्धा लक्षात जनतेच्या लक्षात येत हे खडसे यांना ते ज्या पक्षात सध्या आहेत त्या पक्षातील कोणीतरी सांगण्याची गरज आहे.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी एकनाथ खडसे यांना केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस दिसतात. राजकीय टीका टिपणी, आरोप प्रत्यारोप कोणीही समजून घेईल. खडसे यांची विधानं ही नेहमी व्यक्तिगत स्वरुपाची असतात हे त्यांच्या अनेक पत्रकार परिषद असोत किवा जाहीर सभा असोत यातून आतापर्यंत दिसून आल आहे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असा समज एकनाथ खडसे यांचा होता. मुख्यमंत्री पदाचा दावेदार समजत असणाऱ्या नेत्याकड राज्याच नेतृत्व करण्याची क्षमता असावी लागते सध्या एकनाथ खडसे यांचे नेतृत्व खानदेशात शोधण्याची वेळ आली आहे. तिथे गिरीश महाजन यांनी त्यांची पुरती नाकेबंदी केली आहे. त्यामुळ त्याचं लक्ष बरेचदा गिरीश महाजन यांच्यावरही असत. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना पक्षान एकनाथ खडसे यांना विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली होती. किती मोठी संधी त्यांना स्वतःचे नेतृत्व गुण सिद्ध करण्याची होती. पण त्यांना ते जमल नाही. ते जमल असत तर पक्षाने त्यांचा विचार कुठे ना कुठे केलाच असता. विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली गेली नाही यावरूनच त्यांची एकंदरीत राजकीय परिस्थिती काय आहे हे सुज्ञ जनतेला समजल्याशिवाय राहिलेलं नाही. दूसरीकड महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षान देवेंद्र फडणवीस यांना नेता तर बनवल आहेच. त्यांच्यावर ते नको म्हणत असताना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे अशी जबाबदारी टाकली. याशिवाय इतर राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकांचे प्रभारी म्हणून सुद्धा पक्षान आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी दिली आहे आणि ती त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळून त्यात पक्षाला यश मिळवून दिल आहे. यातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे नेतृत्वगुण केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाला समजत गेले. आज त्यांची देशभरात एक हुशार आणि कर्तबगार नेता अशी प्रतिमा तयार झाली आहे.
हे ही वाचा:
बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप
मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ
गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य
छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!
अशा प्रतिमा तोंडाच्या वाफा घालवून होत नसतात किवा कुणावर व्यक्तिगत टीका टिपणी करून किवा व्यक्तिगत द्वेषातून होत नसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत, स्वच प्रतिमा, निरपेक्ष भावना आणि निष्ठा महत्वाची असते. आजपर्यंत ज्या नेत्यांनी यश मिळवल आणि ते निर्वेद पणे टिकवल त्याचं व्यक्तिमत्व असच घडल आहे. एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास हा उताराच्या दिशेन का वाटचाल करत राहिला याची कल्पना आली असेलच. गावात पारावर बसून गप्पा मारणारे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत कधी उभं राहायचं धाडस करत नाहीत मात्र अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली मत व्यक्त करत असतात. अमेरीकेच कस चुकल आणि रशिया कशी बरोबर हे त्याचं सुरु असता गावातील पारावर बसून. तस आता एकनाथ खडसे हे जळगावमध्ये बसून भाकीत करू लागले आहेत. गुगल केल तर कोणाला काय म्हणतात? हे लोकांना सांगू लागले आहेत. या देशातील आणि राज्यातील जनता खूप सुज्ञ आहे. कोणता नेता कामाचा, कोण खर बोलतो आणि बोललेल करून दाखवतो हे जनतेला चांगल समजत. कारण हा बदलणारा भारत आहे.