एकनाथ खडसेंनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट दिसते!

एकनाथ खडसेंनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट दिसते!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘पुणे जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट दिसत आहे’ असे निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवले आहे. गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी अर्थात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टाने हे निरीक्षण नमूद केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या पुणे येथील जमीन खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. तर याच संदर्भात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवताना खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे म्हटले आहे. खडसे हे महाराष्ट्राचे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून कुटुंबातील सदस्यांना फायदा मिळवून दिला असेही न्यायालयाचे निरिक्षण आहे.

हे ही वाचा:

आज मोदी ब्रिक्स परिषदेला संबोधणार

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

या प्रकरणात सध्या एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हा अटकेत असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. ‘खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात चुकीचा आणि वाईट संदेश जाईल’ असे कोर्टाने म्हटले आहे.

भोसरी येथील जमीन खरेदीच्या गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांचा जावई गिरीश चौधरी हा ६ जुलैपासून अटकेत आहे. पण अद्यापही त्याला जामीन मंजूर झालेला नाही. अटक करण्यापूर्वी चौधरी याची ईडी तर्फे तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली होती.

Exit mobile version