“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर १२ अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!” आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

एकनाथ शिंदे गटावरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्तास दूर

मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.

Exit mobile version